जुनी गाडी खरेदी करण्यापूर्वी या ५ गोष्टी तपासाच!

पुढारी वृत्तसेवा

जुनी कार विकत घेण्यापूर्वी ही ५ महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घ्या! नाहीतर होईल मोठे नुकसान.

नवीन कारमध्ये फसवणूक नसते, पण सेकंड हँड कार घेताना अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अपूर्ण माहितीमुळे अनेक जण फसतात.

कार किती जुनी आहे? अपघात झाला आहे का? गंज लागला आहे का? हे तपासा. बाहेरील डेंट, ओरखडे काळजीपूर्वक तपासा. विक्रेत्याने दिलेली माहिती खरी आहे की नाही, हे स्वतः बघा.

माहितीवर समाधानी असाल तरीही, डील फायनल करण्यापूर्वी टेस्ट ड्राइव्ह मस्ट आहे. इंजिनमधून असामान्य आवाज किंवा गिअर बदलताना त्रास होतोय का? हे तपासा. शक्य असल्यास मेकॅनिकला सोबत घेऊन जा.

AC/हीटर, पॉवर विंडो, म्युझिक सिस्टीम, पार्किंग कॅमेरा हे फीचर्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही, याची खात्री करा. सीट आणि डॅशबोर्डची स्थिती (इंटिरियर) देखील तपासा.

टायर किती जुने आहेत? त्यांची झिज (ट्रेड डेप्थ) तपासा. ब्रेक व्यवस्थित लागत आहेत का? बॅटरीची कामगिरी आणि वय तपासा, कारण नवीन टायर-बॅटरीवर मोठा खर्च येऊ शकतो.

RC आणि वास्तविक चेसिस/इंजिन नंबर जुळतात का? कारवर लोन बाकी नाही ना? सर्व्हिस रेकॉर्ड तपासा. ऑनलाइन मॉडेलच्या किमती तपासून योग्य किंमत निश्चित करा.

या ५ गोष्टी लक्षात ठेवा, मग तुम्ही एका चांगल्या सेकंड हँड कारचे मालक व्हाल आणि तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करण्याची वेळ येणार नाही!