Sara Arjun New Movie: धुरंधर'नंतर सारा अर्जुनला मिळाला नवा चित्रपट; कोण आहे तिचा हिरो?

पुढारी वृत्तसेवा

'धुरंधर २' हा चित्रपट प्रदर्शित होऊन आठ महिने झाले आहेत. रणवीर सिंगने आपल्या पुढच्या 'प्रलय' या चित्रपटाचे काम सुरु केली असले, तरी सारा अर्जुनच्या पुढच्या प्रकल्पाबद्दल कोणतीही बातमी समोर आली नव्हती.

आता मात्र, सारा अर्जुनच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपल्याचे दिसतेय; तिने एका अशा दिग्दर्शकासोबत नवीन चित्रपट साइन केला आहे, जे 'स्पाय-थ्रिलर' चित्रपटांसाठी ओळखले जातात.

चित्रपटसृष्टीत असे म्हटले जाते की, एखादी भूमिका ज्या कलाकारासाठी लिहिलेली असते, ती शेवटी त्याच्यापर्यंत पोहोचतेच.

दिग्दर्शक मनीष शर्मा जे 'बँड बाजा बारात' आणि 'टायगर ३' सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत यांच्या आगामी प्रकल्पाच्या बाबतीत काहीसे असेच घडताना दिसत आहे.

मनीष सध्या यश राज फिल्म्सच्या बॅनरखाली एका रोमँटिक म्युझिकल चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

चित्रपटसृष्टीतील सूत्रांनुसार, मनीष यांनी सुरुवातीला मुख्य भूमिकेसाठी अनित पड्डा आणि शर्वरी वाघ यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र, तारखांच्या अडचणींमुळे त्या या प्रकल्पाचा भाग होऊ शकल्या नाहीत.

त्यानंतर, मनीष यांनी सारा अर्जुनशी संपर्क साधला, जिने 'धुरंधर'मधील आपल्या अभिनयाने मोठी लोकप्रियता मिळवली होती.

साराने या प्रकल्पात रस दाखवला असून मनीष यांच्या प्रस्तावाला होकार दिला आहे. या चित्रपटात ती अमरीश वर्मासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पंजाबमध्ये सुरू होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.