पुढारी वृत्तसेवा
सारा अर्जुनने नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.
या निळ्या साडीतील साराचा लूक पाहून जणू आकाशातील नभं जमिनीवर उतरल्याचा भास होतोय.
साडीचा तो गडद निळा रंग तिच्या गोऱ्या रंगावर अतिशय उठून दिसत आहे.
या साडीवर तिने परिधान केलेला स्लीव्हलेस 'डीप-बॅक' ब्लाउज तिच्या सौंदर्यात भर घालत आहे.
साराने या लूकसाठी स्टायलिश 'मेसी बन' हेअरस्टाईल निवडली आहे. दागिन्यांमध्ये तिने घातलेल्या मोत्यांच्या लेयर्ड नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
साराने अत्यंत आत्मविश्वासाने दिलेल्या पोझेसमुळे तिची 'स्लेंडर फिगर' आणि 'पिंकी एटीट्यूड' उठून दिसत आहे.
साराच्या डोळ्यांतील ती निरागसता आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य साडीच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत आहे.
साराचा हा लूक सध्या फॅशन विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.