Dhurandhar Sara Arjun: 'धुरंधर' चित्रपटातील अभिनेत्रीचा बॅकलेस लूक; २० वर्षीय सारा अर्जुनचे फोटो व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

२० वर्षांची सारा अर्जुन सध्या तिच्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे.

साराने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असून तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.

या चित्रपटात साराने रणवीर सिंहच्या पत्नीची, म्हणजेच अलीनाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

चित्रपटाच्या या यशादरम्यान तिने आता आपला 'सुपर किलर' लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

सारा अर्जुनने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर लेटेस्ट फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. तिच्या या सौंदर्यावरून नजर हटवणे चाहत्यांना कठीण झाले आहे.

साराने मरून रंगाचा 'डीप प्लंजिंग नेकलाइन' असलेला ड्रेस परिधान केला आहे.

या बॅकलेस ड्रेसमध्ये तिने अनेक किलर पोझेस दिल्या आहेत. कधी बसून तर कधी उभं राहून तिने कॅमेऱ्यासमोर आपली अदाकारी दाखवली आहे.

या ड्रेससोबत साराने 'मेसी हेअर बन' बांधला आहे. 'कॅटी आय लूक' मेकअप आणि ब्राऊन न्यूड लिपस्टिकमध्ये सारा अत्यंत सुंदर दिसत आहे.