Wari 2025 |पंढरीचा राणा माझा निवास | तेथें माझा देह जाय जी||

Namdev Gharal

तुका म्हणे नाही येतां परत | पंढरीच्या ठायीं सुख जी ||

पंढरीच्या ओढीने चाललेली माऊली

(सर्व छायाचित्रे : यशवंत कांबळे )

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवुनीया ||

या चिमुकल्‍याला पाहून हा अभंग आठवतो

गंध टिळा लावूं विठ्ठलाच्या मस्तकी | चंदनाचा उटी पंढरीच्या नाथा ||

वारी सोहळयाकडे कुतूहलाने पाहणारा चिमुकला

पंढरी निघाले सज्जन | विठ्ठलदर्शनाला चालिले ||

ही वारकरी रुपातील जोडी पालखी सोहळ्याचा आनंद द्वीगुणीत करतात

एकनाथ म्हणे हरि पंढरीनाथ | तुझ्या दर्शनें तृप्त झालों ||

चिमुकल्‍याच्या चेहऱ्यावरील भक्‍ती सोहळा पाहतानाचे भाव

नाचतों विठ्ठलापुढें | टाळ चिपळ्या हाती धरुनी ||

भक्‍तीरसात दंग झालेला वारकरी आनंदाने नाचताना

टाळ मृदंग नाद वाजे | विठ्ठल नामाचा गजर ||

टाळ मृदंगाचा गजर अखंड वारी सोहळयात गर्जतो

पंढरीच्या रंगी रंगले | वारकरी नाचती एकसुर ||

झिम्‍मा - फुगडीच्या खेळात महिला वारकरी दंग झाले