Sandgrouse |आपल्‍या पंखातून पिलांना पाणी पाजणारा पक्षी

Namdev Gharal

याचे नाव आहे Sandgrouse सॅन्डग्रूस, हा वाळंवटातील पक्षी आहे

हा ज्‍या ठिकाणी अंडी घालतो ते ठिकाण अत्‍यंत कोरडे असते आणि पाण्यापासून कित्‍येक किलोमिटर लांब

मादी पक्षी जमिनीवर खड्डा करून त्यात अंडी घालते वाळवंटी, मैदानी आणि झाडे नसलेल्या मोकळ्या जागा ते पसंत करतात.

यामुळे त्‍याच्या पिलांची तहान भागणवण्यासाठी हा आपल्‍या पिसांचा वापर करतो.

सॅन्डग्रूस ज्‍यावेळी पाणी पिण्यास जातो त्‍यावेळी तो आपले शरिर पाण्यात भिजवतो, त्‍याची पिसे पाणी शोषूण घेतात.

एकावेळी हा पक्षी आपल्‍या पोटावरील व छातीजवळील पिसांमध्ये २० ते ३० मिली पाणी शोषूण घेतो

यानंतर तो या पाण्याने भरलेल्‍या पंखासह आपल्‍या घरट्याजवळ जातो याठिकाणी याची पिली हे पंखातील पाणी शोषूण घेतात व आपली तहान भागवतात.

वैशिष्‍ट्य म्‍हणजे ज्‍यावेळी हा पक्षी पाणी शोषूण घेतो त्‍यावेळी खूप वेगाने उडतो व लवकरात लवकर आपल्‍या पिलांजवळ पोहचतो कारण उष्‍णतेमुळे त्‍या पाण्याची वाफ होत असते.

सॅन्डग्रूस पक्षी दिवसातून एकदातरी पाण्याच्या शोधात लांबचा प्रवास करतात. पाणी पाजण्याचे काम हे नर पक्षी करत असतो

Brahma chicken : ७ किलोची कोंबडी पाहिली का?