पुढारी वृत्तसेवा
सणासुदीच्या काळात आणि गर्दीच्या काळात मोबाईल चोरीच्या घटना वाढतात.
अशा परिस्थितीत जर तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला, तर आता काळजी करण्याची गरज नाही.
‘संचार साथी’ अॅप तुमचे काम करेल.
हे अॅप थेट दूरसंचार विभागाने लाँच केले आहे आणि त्याचा उद्देश यूजर्सना मोबाईल सुरक्षेची हमी देणे हा आहे.
‘संचार साथी’ हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने विकसित केलेला एक सरकारी डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
मोबाईल चोरी होण्याला आळा घालणे आणि बनावट किंवा डुप्लिकेट मोबाईल कनेक्शनला प्रतिबंध करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे.
तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला, तर या अॅपमध्ये मोबाईलचा नंबर टाकून फोन त्वरित ब्लॉक केला जाऊ शकतो.
यानंतर, जर कोणी तो मोबाईल चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न केला, तर तो नेटवर्कवर काम करणार नाही.
तसेच, पोलिस आणि टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीने फोन शोधला जाऊ शकतो. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करून घेता येते.