Salar de Uyuni : जिथे आकाश व जमीन एकत्र येतात!

Namdev Gharal

बोलिव्हीया या देशात एक असे ठिकाण आहे की जिथे गेल्यावर तुम्हाला आकाश व जमीन एकत्र आल्याचा भास होईल.

या ठिकाणाचे नाव आहे 'सलार दी उयुनी' (Salar de Uyuni) हे जगातील सर्वात मोठे मिठाचे मैदान आहे. याला 'पृथ्वीवरील स्वर्ग' किंवा 'निसर्गाचा आरसा' म्हटले जाते.

येथे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमीनीचा आरसा तयार होतो व आकाशाचे रिफ्लेक्शन तेथे होते यामुळे जमीन व आकाश एकत्र आले आहे असेच वाटते

हे तब्बल १०,५८२ चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. हे एवढे विशाल आहे की अंतराळातूनही (Space) स्पष्टपणे दिसते.

पावसाळ्यात जेव्हा या मिठाच्या थरावर पाण्याचा पातळ थर साचतो, तेव्हा हे मैदान जगातील सर्वात मोठ्या 'नॅचरल मिरर'मध्ये रूपांतरित होते. आकाश आणि जमीन यातला फरक ओळखणे कठीण होते.

येथे १० अब्ज टनांहून अधिक मीठ असल्याचा अंदाज आहे. स्थानिक लोक आजही येथून पारंपरिक पद्धतीने मीठ काढतात.

पर्यटक येथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भेट देतात पर्स्पेक्टिव्ह फोटोग्राफी हे खूप चांगला पॉईंट जमीन पूर्णपणे सपाट आणि पांढरी असल्याने अंतराचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे अप्रतिम फाटो निघतात

जरी येथे झाडं-झुडपं नसली तरी, दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात येथे हजारो गुलाबी फ्लेमिंगो पक्षी प्रजननासाठी येतात.

येथे पर्यटकांच्या राहण्यासाठी चक्क मिठाच्या विटांपासून बनवलेली हॉटेल्स आहेत. येथील भिंती, बेड आणि खुर्च्यासुद्धा मिठाच्याच असतात!

प्रागैतिहासिक काळातील अनेक विशाल सरोवरे कोरडी पडल्यामुळे या अवाढव्य मिठाच्या मैदानाची निर्मिती झाली आहे.

जगातील एकूण लिथियम साठ्यापैकी ५०% ते ७०% साठा एकट्या या मैदानात आहे, ज्याचा वापर स्मार्टफोन आणि कारच्या बॅटरीसाठी केला जातो.