पुढारी वृत्तसेवा
शरीरातील उर्जेसाठी तुपाची स्निग्धता आवश्यक, तुप मन आणि बुद्धीची पक्वता वाढवते.
लहान बाळापासून अगदी आजोबांपर्यंत साऱ्यांनाच साजुक तूप खाणे आरोग्यदायी ठरते.
शरीरातील स्निग्धता टिकवून ठेवण्यासाठी तूप खाणे आवश्यक.
आयुर्वेदात पंचकर्मासाठी जुन्या तुपाचा पुरेपूर वापर केला जातो.
तुपामध्ये जीवनसत्वे ए, डी, ई आणि के असतात. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
तुपाच्या सेवनाने वजन वाढते. पचनास मदत करते. सांध्यांना मजबूत करते. तूप शरीराला डिटॉक्स करते.
बाजारात गाईचे तूप, म्हशीचे तूप, देशी गाईच्या दुधाचे तूप मिळते. तूप जितके जुने तितके औषधी मानतात.
तुपाच्या जास्त सेवनाने हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होउ शकतो. फॅटी लिव्हर आजाराने त्रस्त लोकांनीही तुपाचे सेवन कमीच करावे.
जेंव्हा पोट फुगल्यासारखे वाटत असेल किंवा अपचनाचा त्रास होत असेल त्यावेळी तुपाचे सेवन टाळावे.