सैयारा तू तो बदला नहीं है… अंगावर काटा आणणाऱ्या 'या' १० सेकंदांच्या सीनमुळे थिएटर होताहेत हाऊसफुल

मोहन कारंडे

मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ चित्रपटाने चाहत्यांना वेड लावले आहे.

'सैयारा'ने ओपनिंग डे ला तब्बल २१ कोटी रुपये कमावल्यानंतर दुसऱ्या दिवशी २४ कोटींचा गल्ला जमा केला.

अहान पांडे आणि अनीत पड्डा या नवख्या चेहऱ्यांना घेऊन आलेल्या या रोमँटिक चित्रपट वर्षातील सर्वात मोठा सरप्राइज हिट ठरला आहे.

'सैयारा'ने अनेक स्टार्सच्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. राजकुमार रावचा ‘मालिक’, शाहिद कपूरचा ‘देवा’ आणि काजोलचा ‘माँ’ हे चित्रपटही फिके पडले आहेत.

यावरून, एक गोष्ट स्पष्ट आहे की, प्रेमकथांना जनरेशन Z कडून भरभरून साथ मिळत आहे.

‘सैयारा’ चं आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे, कोणताही मोठा प्रमोशनल प्लॅन नव्हता.

दिग्दर्शक मोहित सूरीने अहान-अनीतची जोडी प्रदर्शना आधी गुप्त ठेवली.

हीच रणनीती मोहितने ‘आशिकी 2’ मध्ये वापरली होती आणि ती पुन्हा यशस्वी ठरली.

सर्वात महत्वाचं म्हणजे अहान पांडेचा इमोशनल स्टेजवर गात असलेला सीन प्रेक्षकांच्या मनाला भिडतोय.

हा गाण्याचा सीन ऐकून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो, प्रेक्षकांच्या मते, हा एक सीनच सिनेमागृहात खेचून नेतोय.

‘सैयारा’ चित्रपटामुळे हे सिद्ध होत की, जर कथा हृदयाला भिडली, तर प्रेक्षक नव्या चेहऱ्यांनाही मोठ्या मनाने स्वीकारतात.

कोणतेही प्रसिद्ध चेहरे, कोणताही पीआर प्लॅन नसताना केवळ भावना, संगीताच्या जोरावर ‘सैयारा’ हा चित्रपट या वर्षातील सर्वात हिट प्रेमकथा ठरला आहे.

Genelia : जेनेलियाचा साडी आणि गजऱ्यातला मोहक लूक