पुढारी वृत्तसेवा
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस आणि बिनधास्त अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
सईने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये सईचा स्टायलिश आणि आकर्षक लूक पाहायला मिळत आहे.
हा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
सईच्या या 'हॉट' लूकमध्ये मोकळे आणि हवेत उडणारे केस सौंदर्यात भर घालत आहेत.
हे फोटो शेअर करताना सईने खास कॅप्शन दिले आहे. तिने स्वतःला 'A certified firecracker' असे म्हटले आहे.
सईचा हा कलरफुल, ग्लॅमरस आणि खास लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
तिच्या बिनधास्त अदाकारीसाठी आणि फॅशन सेन्ससाठी तिचे चाहते नेहमीच तिचे कौतुक करत असतात.