संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने वाल्हेतील मुक्कामानंतर सातारा जिल्ह्याच्या दिशेने प्रस्थान ठेवले.या दरम्यान माऊलींच्या पादुकांचे आज नीरा स्नान पार पडले .पालखी सोहळ्यासह वारकऱ्यांचे वारीमार्गात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या सुमारास निरा येथे पोहोचला.निरेतील प्रसिद्ध दत्त घाटावर यावेळी माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात आले.पुणे-सातारा जिल्ह्यांच्या सीमा ओलांडणारी ही परंपरा दरवर्षी उत्साहात पाळली जाते