पुढारी वृत्तसेवा
श्रावण महिन्यात उपवासाला एकच पदार्थ निवडायचा असेल तर, साबुदाण्यापेक्षा भगर अधिक पोषणमूल्य देणारा पर्याय ठरतो
उपवासाच्या आहारात साबुदाणा की भगर? असा प्रश्न असेल, तर आरोग्याच्या दृष्टीने साधारणपणे भगर (Barnyard millet/सावा) हा अधिक पौष्टिक पर्याय ठरतो
साबुदाणा मुख्यतः ऊर्जेसाठी उपयुक्त ठरतो, मात्र, तो कशासोबत आणि किती प्रमाणात खाल्ला जातो, यावर अवलंबून असतो
भगर ही Barnyard millet असून 100 ग्रॅममध्ये सुमारे 307 kcal, 11.2 ग्रॅम प्रथिने आणि 65.5 ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. ती फायबरचा चांगला स्रोत आहे
साबुदाण्यात स्टार्च, कार्बोहायड्रेट असल्याने त्यातून पटकन ऊर्जा मिळते; परंतु प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे तुलनेने कमी मिळतात
भगरमध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचनास मदत होते आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होऊ शकते. लोह आणि काही इतर पोषक घटकांचा चांगला स्रोत आहे
दीर्घकाळ उपवासामुळे अशक्तपणा किंवा ऊर्जा कमी जाणवत असेल, तर योग्य प्रमाणातील साबुदाणा उपयोगी ठरू शकतो
साबुदाणा सहज पचणारा आणि पटकन ऊर्जा देणारा असून कार्बोहायड्रेटची मात्रा अधिक प्रमाणात मिळण्यास मदत होते
भगरमध्येही कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी भगरही योग्य प्रमाणातच खाणे आवश्यक आहे