Saanen Goat | ही शेळी आहे ‘दुधाची राणी’, दररोज देते ३ ते ५ लिटर दूध

Namdev Gharal

शेळी ही शेतकरयासाठी शेतीबरोबर हक्काचे उत्‍पन्न देणार प्राणी, शेळीचे दूधही म्हैस- गायीच्या दुधापेक्षा अधिक पौष्टिक मानले जाते

पण एक म्हणजे शेळी हा लहान प्राणी असल्याने त्‍याचे दूधाचे प्रमाणही खूप कमी असते. एक शेळी सरासरी ५०० मिली ते १ लिटर दूध देते

पण दूधाची राणी म्हणून ओळख असलेली शेळी म्हणजे सानेन शेळी, ही ३ ते ५ लिटर इतके दूध देते. सानेन शेळी मूळची स्वित्झर्लंडमधील सानेन व्हॅलीतील आहे. ही जात प्रामुख्याने व्यावसायिक दुग्धव्यवसायासाठी पाळली जाते.

योग्य चारा आणि व्यवस्थापन असल्यास, ही शेळी वर्षाकाठी ८०० ते १००० लिटर पर्यंत दूध देऊ शकते.

अत्यंत शांत आणि मिळून-मिसळून राहणाऱ्या स्वभावाच्या असतात. या शेळ्या पूर्णपणे पांढऱ्या किंवा क्रीम रंगाच्या असतात

याचे पालन प्रामुख्याने युरोपातच केले जाते. विषेशता स्वित्झर्लंडमध्ये कारण ही जात थंड प्रदेशात विकसीत झाली आहे

सध्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि युरोपातील देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक दुग्धव्यवसायासाठी सानेन पाळली जाते.

सानेन शेळीचे दूध सरासरी १०० रुपये ते २५० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते. मोठ्या शहरांमध्ये हा दर ३०० रुपयांपर्यंतही जाऊ शकतो.

शरीरयष्टी: यांचे कान ताठ असतात आणि नाक सरळ असते. बहुतेक सानेन शेळ्यांना शिंगे नसतात.

सामान्य शेळी प्रामुख्याने मांस उत्पादनासाठी पाळली जाते, तर सानेन ही केवळ दूध उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे.

सानेन शेळीच्या दुधाचा वापर महागडे साबण, लोशन आणि क्रीम बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे या दुधाला व्यावसायिक क्षेत्रात मोठी मागणी आहे