Russell Viper | एकावेळी ७० पिल्लांना जन्म? घोणस सापाबद्दलची रंजक माहिती

Namdev Gharal

भारतातील प्रमुख चार विषारी सापांपैकी घोणस हा आकाराने व वजनानेही मोठा असतो तसेच हा साप मोठ्या प्रमाणात विषही सोडतो त्‍यामुळे अत्‍यंत धोकादायक ठरतो

याचे आणखी वैषिष्ठये म्हणजे याचा आकार काहीवेळा लोक याला छोटा अजगर समजतात व धोकादायकरित्‍या हाताळतात यामुळे याच्याकडून मोठ्या प्रमाणात दंश होतात

हा एकमेव साप आहे जो अंडी न देता थेट पिलांना जन्म देतो. ते एकाचवेळी सरासरी ४० पर्यंत पिलांना जन्म देतात पण दुर्मिळ केसेसमध्ये ६० ते ७० इतक्या मोठ्या प्रमाणात घोणस पिल्लांना जन्म देते.

साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा दरम्यान (जून ते ऑगस्ट) ही पिल्ले जन्माला येतात.

पण इतक्या मोठ्या प्रमाणाज प्रजनन करुन सुद्धा यांची संख्या मात्र निर्सगच नियंत्रित ठेवतो. ही सर्व पिल्ले जगत नाहीत. निसर्गाच्या चक्रात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो

लहान पिल्ले आकाराने लहान असल्यामुळे पक्षी (उदा. घार, ससाणा), मुंगूस आणि इतर मोठे साप यांची शिकार होतात.

जन्मतःच काही पिल्ले कमकुवत असतात, ती अन्नाभावी किंवा वातावरणातील बदलांमुळे दगावतात

तज्ज्ञांच्या मते, जन्माला आलेल्या एकूण पिल्लांपैकी केवळ १० ते २० टक्के पिल्लेच पूर्ण वाढ होईपर्यंत जगू शकतात

जन्माला आलेले घोणसाचे पिल्लू पहिल्या दिवसापासूनच विषारी असते. ते स्वतःचे रक्षण करण्यास आणि शिकार करण्यास सक्षम असते.

पिल्ले जन्माला आल्यानंतर आईवर अवलंबून राहत नाहीत, ती लगेच आपल्या वाटेने निघून जातात.