पुढारी वृत्तसेवा
१ जानेवारी २०२६ पासून नवीन वर्षाच्या सुरुवातीसोबतच अनेक मोठे आर्थिक नियम बदलत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो.
आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत डिसेंबरमध्येच संपत आहे. जर ते लिंक केले नाहीत, तर १ जानेवारीपासून तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल.
बँक UPI आणि डिजिटल पेमेंटचे नियम अधिक कडक केले जात आहेत. फसवणूक रोखण्यासाठी सिम व्हेरिफिकेशनचे नियमही कडक करण्यात येत आहेत
SBI, PNB आणि HDFC या बँकांनी कर्जाचे दर कमी केले आहेत, जे १ जानेवारीपासून लागू होणार आहेत. मुदत ठेवींचे नवीन व्याजदरही लागू होतील.
दर महिन्याला एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल होतो. १ जानेवारीपासून एलपीजीच्या किमतीत घट किंवा वाढ होऊ शकते.
ऑईल कंपन्या दर महिन्याला एलपीजीसोबतच सीएनजी-पीएनजी आणि एटीएफ (ATF) चे दर बदलतात. १ जानेवारीपासून यामध्ये बदल अपेक्षित आहेत.
नवीन आयकर कायदा २०२५ पूर्णपणे १ जानेवारी २०२६ पासून लागू होणार नाही, परंतु सरकार जानेवारीपर्यंत नवीन ITR फॉर्म आणि नियम अधिसूचित करेल.
८वा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे. ७ व्या वेतन आयोगाची मुदत ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे.
उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांना 'पीएम-किसान' योजनेचा लाभ घेण्यासाठी युनिक किसान आयडी आवश्यक असेल.
१ जानेवारी २०२६ पासून भारतातील अनेक प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या गाड्यांच्या किमती वाढवणार आहेत.