Rose Water Benefits: ५ मिनिटांत चेहरा टवटवीत होईल; फक्त 'या' पद्धतीने गुलाब जल वापरा

पुढारी वृत्तसेवा

कडक ऊन, घाम आणि प्रदूषणामुळे उन्हाळ्यात चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसू लागतो. अशा वेळी 'गुलाब पाणी' ठरेल तुमच्यासाठी वरदान!

गुलाब पाणी केवळ थंडावा देत नाही, तर त्वचेचा PH स्तर संतुलित ठेवते. यामुळे चेहरा नैसर्गिकरीत्या 'ग्लो' करू लागतो.

चेहऱ्याची चमक परत मिळवण्यासाठी १ चमचा बेसन आणि १ चमचा गुलाब पाणी यांची पेस्ट तयार करा.

हा पॅक चेहऱ्यावर १५ मिनिटे लावा आणि थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून दोनदा वापरल्यास त्वचा फ्रेश दिसेल.

उन्हाळ्यात त्वचा तेलकट होऊन पिंपल्स येत असतील तर १ चमचा मुलतानी माती आणि २-३ चमचे गुलाब पाणी एकत्र करा.

हा फेस पॅक सुकेपर्यंत चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल निघून जाईल.

केमिकल युक्त टोनरपेक्षा गुलाब पाणी उत्तम! स्प्रे बाटलीत गुलाब पाणी भरून फ्रिजमध्ये ठेवा.

बाहेरून आल्यावर थंड गुलाब पाण्याचा स्प्रे चेहऱ्यावर मारा. तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल.

कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेचा प्रकार ओळखा आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.