Namdev Gharal
निसर्गातील काही पक्षी आपली घरटी अशी बांधतात की मनुष्यप्राणीही हैराण होतो अशाच एका पक्ष्याविषयी आपण जाणून घेऊ
रॉक रेन हा हा प्रामुख्याने उत्तर आणि मध्य अमेरिकेतील खडकाळ, कोरड्या पर्वतरांगा आणि दऱ्यांमध्ये आढळणारा एक लहान, चपळ तपकिरी रंगाचा पक्षी आहे.
हा पक्षी आपल्या घरट्याच्या प्रवेशद्वारासमोर लहान-लहान सपाट खडे किंवा दगडांचे तुकडे रचून एक खास पायवाट (Paved Pathway) तयार करतो. ही त्याची अनोखी कला आहे
अलार्म म्हणून याचा वापर केला जातो घरट्यासमोर रचलेल्या या दगडांवरून एखादा शिकारी किंवा साप गेल्यास दगडांचा आवाज होतो, ज्यामुळे पक्ष्याला धोक्याची पूर्वसूचना मिळते.
एका घरट्यासमोर रस्ता तयार करण्यासाठी हा चिमुकला पक्षी स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजनाचे शेकडो बारीक दगड चोचीतून वाहून आणतो. यासाठी जवळपास पक्षी २५० ते ५०० पेक्षा दगड गोळा करतो
रॉक रेन खडकांच्या कपारीत किंवा गुहेसारख्या खोल जागेत गवत आणि पिसांचा वापर करून कपच्या आकाराचे घरटे बनवतो
शरीराचा फिकट राखाडी-तपकिरी रंग आणि बारीक ठिपके खडकांशी तंतोतंत जुळतात, ज्यामुळे हा पक्षी सहज दृष्टीस पडत नाही.
याचे आणख एक वैशिष्टये म्हणजे यातील नर रॉक रेनकडे गाण्याचे १०० पेक्षा अधिक प्रकार असतात; तो खडकावर उभा राहून वेगवेगळ्या सुरांमध्ये गातो.
लांब आणि किंचित बाकदार चोचीमुळे हा पक्षी खडकांच्या खोल भेगांमधून किडे, कोळी आणि अळ्या सहज बाहेर काढून खातो
१५ ते १८ ग्रॅम इतक्या कमी वजनाच्या या पक्ष्याची लांबी ५ ते ६ इंच असते, तर पंखाची लांबी ९ इंचापर्यंत असते. आपल्याकडील चिमणीशी साधर्म्य असणारा हा पक्षी आहे