Rice Water for Hair : तांदळाच्या पाण्याने केस धुण्याचे ८ फायदे - मिळवा दाट आणि रेशमी केस

पुढारी वृत्तसेवा

केस निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी घरगुती उपाय शोधत असाल, तर तांदळाचे पाणी हा उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या त्याचे फायदे!

तांदळाच्या पाण्यात विटामिन E आणि विटामिन B भरपूर प्रमाणात असते. हे पोषक घटक केसांना मुळांपासून मजबूत करण्याचे काम करतात.

तांदळाचे पाणी केसांना 'नैसर्गिक केराटिन' प्रमाणे पोषण देते. यामुळे केस मऊ (Soft) आणि रेशमी (Silky) होण्यास मदत होते.

केस वारंवार गुंतणे आणि तुटणे ही समस्या तांदळाच्या पाण्यामुळे कमी होते. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने केस अधिक दाट दिसतात.

तांदळाच्या पाण्यात अँटी-ऑक्सीडेंट्स आणि मिनरल्स असतात. हे घटक स्कॅल्पवरील खाज आणि कोंड्याची (Dandruff) समस्या दूर करण्यास मदत करतात.

तज्ज्ञांच्या मते, तांदळाच्या पाण्यात 'आइनोसटोल' नावाचे संयुग असते, जे केसांच्या मुळांना पोषण देऊन हेअर ग्रोथ वाढवण्यास मदत करते.

ज्यांचे केस खूप पातळ आणि कमकुवत आहेत, त्यांच्यासाठी तांदळाचे पाणी नियमित वापरणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे केसांना जाड आणि आरोग्यदायी बनवते.

केस वारंवार गुंतणे आणि तुटणे ही समस्या तांदळाच्या पाण्यामुळे कमी होते. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने केस अधिक दाट दिसतात.

भात शिजवताना पेज गाळून घ्या. ती केसांना १५ मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. किंवा तांदूळ भिजवून त्याचे पाणीही वापरू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.