Rice Eating Tips | भात खायला खूप आवडतो पण शुगरची भीती वाटते तर या पद्धती वापरा!

Namdev Gharal

जर तुम्हाला भात खायला खूप आवडत असेल, तर शुगरचा धोका न वाढवता तो खाण्याच्या काही सोप्या पद्धती पाळा त्‍यामुळे तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ टाळावा लागू नये

वरण-भाजीसोबत खा: कधीही नुसता भात किंवा फक्त आमटी-भात खाणे टाळा. भातासोबत भरपूर प्रमाणात डाळ (वरण), कडधान्ये किंवा हिरव्या पालेभाज्या खा.

भाज्यांमधील फायबर आणि डाळींमधील प्रोटीनमुळे भातातील स्टार्च शरीरात हळूहळू शिजतो आणि शुगर अचानक वाढत नाही.

भात कुकरमध्ये शिजवण्याऐवजी पा पातेल्यात (अधण ठेवून) शिजवा आणि त्याचे जास्तीचे पाणी (पेज/कांजी) काढून टाका. यामुळे भातातील स्टार्चचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी होते

रात्रीच्या वेळी आपली शारीरिक हालचाल कमी होते, त्यामुळे रात्री जास्त भात खाल्ल्यास वजन आणि शुगर दोन्ही वाढू शकते. भात शक्यतो दुपारच्या जेवणात खाणे उत्तम.

भात थंड करून खा हा एक अतिशय शास्त्रीय आणि फायदेशीर उपाय आहे. भात शिजवल्यानंतर तो लगेच गरम-गरम खाण्याऐवजी थोडा वेळ थंड होऊ द्या मग खा

भात थंड झाल्यामुळे त्यातील स्टार्चचे रूपांतर 'रझिस्टंट स्टार्च' (Resistant Starch) मध्ये होते. हा स्टार्च शरीरात लवकर पचत नाही आणि फायबरसारखा काम करतो.

व्हेज पुलाव किंवा खिचडी: भात शिजवताना त्यात भरपूर प्रमाणात मटार, गाजर, फरसबी, फ्लॉवर किंवा मेथी अशा भाज्या टाका. यामुळे भाताचे प्रमाण कमी होते आणि भाज्यांमुळे फायबर वाढते.

डाळीचे प्रमाण वाढवा: वरण-भात खाताना भाताचे प्रमाण कमी आणि वरणाचे (किंवा आमटीचे) प्रमाण दुप्पट ठेवा.

जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे 'वज्रासनात' बसा किंवा घरामध्येच १०० ते १५० पावले चाला. यामुळे शरीराला भातातून मिळालेली ऊर्जा लगेच वापरली जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.