पुढारी वृत्तसेवा
हवेतील धूळ, घाण आपल्या त्वचेवरील छिद्रांमध्ये जमा होते. परिणामी आपली त्वचा खरखरीत होते. त्यावर काळ्या रंगाचे बारीक-बारीक ठिपके पाहायला मिळतात. त्यालाच आपण ब्लॅकहेड्स म्हणतो. आता नाकावरचे हे चिवट ब्लॅकहेड्स कसे काढायचे ते पाहुयात.
चेहऱ्यावर वाफ घेणे : एका पातेल्यात उकळलेले पाणी घ्या. त्यामध्ये थोडासा कापूर घालून पाण्याची वाफ चेहऱ्यावर घ्या. ही क्रिया केल्याने त्वचा स्वच्छ होते.
बेकिंग सोडा मास्क : एक छोटा चमचा बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी घाला. दोन्ही गोष्टी एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ ते २० मिनिटांसाठी नाकावर लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा.
एक चमचा लिंबाचा रस, १ चमचा मध, १ चमचा साखर एका बाउलमध्ये घ्या. सर्व पदार्थ नीट मिसळून तयार झालेला मास्क नाकावर एकसमान लावून ठेवा. ३० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.
अंड्याच्या पांढऱ्या भागात ॲल्बुमिन नावाचा घटक आढळून येतो. हा घटक त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करतो. अंड्याचा पांढरा भाग सूक्ष्म छिद्र आक्रसण्यातही मदत करतो. या फेस मास्कच्या नियमित वापरामुळे त्वचा उजळण्यास मदत होते.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन नावाचे केमिकल आढळते. लाइकोपीन त्वचेवर अँटी ऑक्सिडंटचा प्रभाव करते. फ्री रॅडिकल्स हटवण्यात मदत करते. टोमॅटोमध्ये आढळणारे अँटी बॅक्टेरियल गुण ब्लॅकहेड्सला कमी होण्यास मदत करतात.
हळदीमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते. अँटिऑक्सिडंटने समृद्ध हळद ब्लॅकहेड्सवर प्रभावी ठरते. हळदीमध्ये खोबरेल तेल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर 10-15 मिनिटे लावून ठेवा आणि धुवा. यामुळे फायदा होउ शकतो.
तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि पोअर्स ओपन करण्याचे कार्य करते. तसंच हे पीठ उत्तम स्क्रबर म्हणून कार्य करते. यामुळे त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळते. वरील सर्व गोष्टी सर्वसामान्य माहितीवर आधारित आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानेच वापर करणे हितकारक ठरेल.