Beauty tips: चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी नेहमीच महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सची किंवा पार्लरमधील ट्रिटमेंट्सची गरज नसते.

Beauty Tips | file photo

'फेस योगा' द्वारे तुम्ही घरी नैसर्गिकरित्या चमकदार त्वचा मिळवू शकता. कसा सराव करायचा ते जाणून घ्या.

Beauty tips | file photo

१. फिश फेस

आपले दोन्ही गाल आतल्या बाजूला खेचा, जेणेकरून तुमचा चेहरा माशासारखा दिसेल. या स्थितीत १० सेकंद तसेच थांबा. यामुळे गालांचे स्नायू टोन होतात.

२. आय लिफ्ट

तुमच्या भुवया वरच्या दिशेला उचला आणि १५ सेकंद तसेच राहा. यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या स्नायूंची हालचाल वाढून थकवा दूर होतो.

३. नेक स्ट्रेच

चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि सुरकुत्यां कमी करण्यासाठी नियमित मान स्ट्रेचिंग करा. यासाठी मान मागे झुकवून वर पाहा.

फेस योगाचे फायदे

फेस योगामुळे रक्तभिसरण सुधारते, सुरकुत्या कमी होतात, हनुवटीखालील साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते.

ही काळजी घ्या?

फेस योगा करताना चेहऱ्यावर खूप जास्त दबाव देऊ नका. फक्त सातत्य ठेवा. जर तुम्हाला त्वचेच्या समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच हा सराव सुरू करा.