घरीच्या घरी मिळणारी 'तुळस' आरोग्यासाठी आहे रामबाण उपाय!

अमृता चौगुले

घशाचे आजार : या आजारांवर तुळशीच्या पानांचा रामबाण म्हणून उपयोग केला जातो.  

डोकेदुखी : तुळशीच्या पानांची व दालचिनीची एकत्रित तयार केलेली पेस्ट कपाळावर लावल्यास डोके दुखायचे कमी होते.

दात व हिरड्यांसाठी : दाताच्या व हिरड्यांच्या वाढीसाठी तसेच, त्यांच्या बळकटीसाठी तुळशीच्या पानांचा फायदा होतो.  

श्वसनाचे आजार :  श्वासनलिकेचा दाह, फ्ल्यू व इतर गोष्‍टींसाठी तुळशीच्या पानांचा चहा करून पिल्यास तात्‍काळ फरक पडतो.  

बुद्धी व एकाग्रतेसाठी : लहान मुलांची बुद्धी वाढण्यासाठी व अभ्यासात एकाग्रतेसाठी तुळशीच्या पानांचा नियमित वापर करावा.  

डासांपासून बचाव : परिपक्व झालेली तुळशीची पाने कुस्करून घरातील खोल्यांमध्ये ठेवल्यास घरातील डासांचे व कीटकांचे प्रमाण कमी होते.