पुढारी वृत्तसेवा
सध्या बाजारपेठेत कोणतेही गोडेतेल घ्या ते. त्याचावर रिफायन्ड ऑईल असे हमखास लिहलेले आढळेल.
रिफायन्ड ऑईल काय असते ते जाणून घेऊ, तेलबीया (सोयाबीन, सूर्यफूल, पाम, कापूसबी) यांपासून तेल काढल्यानंतर ते Refined करण्यासाठी काही प्रक्रिया केल्या जातात
पण या प्रक्रिया करताना मुळ तेलबियातील नैसर्गिक गुणधर्म, आवश्यक घटक टिकून राहतात का हा प्रश्न आहे.
तेल काढण्यासाठी या तेलबीया उकळल्या जातात तसेच Chemical Solvent (Hexane) करुन हे तेल काढतात यात नैसर्गिक गुणधर्म आधीच कमी होतात
त्यानंतर तेलातले फॉस्फोलिपिड्स काढून टाकतात, ॲसिड (Fatty Acids) काढण्यासाठी केमिकल्स वापरतात
रंग काढण्यासाठी Bleaching केले जाते तसेच कच्चा वास वास घालवण्यासाठी अत्यंत जास्त तापमानात उकळवतात
पण या रिफाईन्ड करण्याच्या प्रोसेसमध्ये व्हिटॅमिन A, D, E, K, तसेच चव आणि सुगंध सगळे जवळपास नष्ट होतात
परिणामी यामध्ये न्युट्रीशिअन व्हल्यू जवळजवळ शून्य होतात. तर प्रोसेमध्ये जास्त तापमानामुळे Trans fat तयार होण्याची शक्यता असते
काही तज्ञांच्या मते जास्त प्रमाणात रिफाईन्ड तेलाचे सवेन करणे हृदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीस इत्यादी रोगांना आमत्रण देणारा ठरण्याची शक्यता असते.
या तेलाला वास नसतो तसेच हे जास्त दिवस टिकते, व किंमतही परवडणारी असते (कच्ची घाणीच्या तेलाच्या तुलनेत)
त्यामुळे या तेलासोबत इतर कच्ची घाणी तेल आलटून पालटून वापरणे योग्य