पुढारी वृत्तसेवा
हिवाळा सुरू झाला की बाजारात लाल आणि नारंगी गाजरांची गर्दी होते. पण तुम्हाला माहीत आहे का, कोणतं गाजर कशासाठी वापरावं?
लाल गाजर हिवाळ्यातील 'सुपरफूड' आहे. यामध्ये 'लायकोपीन' असते, तर नारंगी गाजरात डोळ्यांसाठी उत्तम असलेले 'बीटा-कॅरोटीन' असते.
जर तुम्ही हलवा किंवा ज्यूस बनवणार असाल, तर नेहमी गडद लाल रंगाची गाजरं घ्या. ही जास्त रसाळ आणि गोड असतात.
उत्तम कोशिंबीर किंवा सॅलडमध्ये कुरकुरीतपणा हवा असेल, तर नारंगी गाजर वापरा. हे वर्षभर मिळते आणि लवकर मऊ पडत नाही.
अनेकांना वाटतं जाड गाजरात जास्त गर असतो, पण ते चुकीचं आहे. जाड गाजराचा मधला भाग कडक आणि फिका असतो.
गाजरं खरेदी करताना नेहमी लांब आणि पातळ गाजरं निवडा. ही आतून पूर्ण लाल, गोड आणि पचायला हलकी असतात.
गाजर ताजे आहे की नाही हे पाहण्यासाठी ते थोडे वाकवून पहा. जर ते कडक आवाजासह तुटले, तरच ते ताजे समजावे.
जर गाजर रबरासारखे वाकत असेल, तर ते काढून जास्त दिवस झाले आहे. अशा गाजरातील पोषक तत्वे आणि रस कमी झालेला असतो.
गाजराचा वरचा भाग हिरवा असेल तर तो भाग कडू असू शकतो. खरेदी करताना पूर्णपणे एकसमान रंग असलेली गाजरं घ्या.
लाल गाजर नैसर्गिकरित्या गोड असते. त्यामुळे हलवा बनवताना साखरेचा वापर कमी करावा लागतो, जे आरोग्यासाठीही चांगले आहे.