मोहन कारंडे
भोपळा साधारण वर्ष, दीड वर्ष टिकून राहू शकतो. चांगला पिकलेला जुना भोपळा गुणकारी असतो. भोपळ्याच्या बियांपासून तेल काढतात. शिवाय बिया सोलून त्यांतील गराचे तुकडे मिठाईवर लावण्यास वापरतात.
रक्ताची उलटी, कफातून रक्त पडणे : भोपळ्याच्या बियांचा हलवा किंवा पाक करून देतात.
जंत : बी सोलून त्याचा गर नुकताच किंवा गुळाबरोबर खाण्यास द्यावा.
दमा : मूळाचे चूर्ण व सुंठपूड एकत्र कालवून दिवसातून २-३ वेळा घ्यावे. (हे औषध बरेच काळपर्यंत घ्यावे.)
आम्लपित्त : भोपळ्याच्या रसात खडीसाखर घालून घ्यावा.
मूतखडा : भोपळ्याच्या रसात जवखार व खडा हिंगाची पावडर घालून घ्यावा.
दारूची नशा उतरण्यास : भोपळ्याच्या रसात गूळ घालून पिण्यास द्यावा.
विंचू दंशावर : भोपळ्याचा देठ थंड पाण्यात उगाळून दंशस्थानी लेप करावा.
पंडुरोगात : सुकविलेल्या भुरकट रंगाच्या भोपळ्याचे चूर्ण दिवसातून एकदा दूध किंवा पाण्याबरोबर घ्यावे. जेवणात आलटून पालटून भुरकट रंगाच्या भोपळ्याची भाजी करून घ्यावी.