Red Banana: सुंगधी लाल केळ... ह्रदयरोग, डोळ्यांच्या समस्या अन् बद्धकोष्ठता सर्वांवर ठरतात रामबाण

Anirudha Sankpal

लाल केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-B6 आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं.

चव साध्या पिवळ्या केळीसारखी पण थोडी रास्पबेरीसारखी गोड आणि सुगंधी लागते.

हे केळं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं कारण यात पोटॅशियम व मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असतं.

लाल केळीत ल्यूटिन, बीटा-कॅरोटीनसारखे घटक असल्याने दृष्टीसाठी आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे.

यात अँटीऑक्सिडंट्स जास्त असल्याने पेशींचं नुकसान, सूज, हृदयरोग यापासून संरक्षण मिळू शकतं.

व्हिटॅमिन-C आणि B6 रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात त्यामुळे शरीराची संसर्गाविरुद्ध ताकद वाढते.

या केळ्यातील प्रीबायोटिक फायबर पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवून पचन सुधारते.

बद्धकोष्ठता, गॅस, जडपणा कमी करण्यास फायबर मदत करतं.

स्मूदी, ओट्स, आईस्क्रीम, बेकरी रेसिपी किंवा थेट खाण्यासाठी लाल केळी एक पौष्टिक आणि चविष्ट पर्याय आहे.

येथे क्लिक करा