रणजित गायकवाड
वनडे क्रिकेटमध्ये विकेटकीपर-फलंदाजांची भूमिका आता केवळ विकेटच्या मागे मर्यादित राहिलेली नाही, तर त्यांनी आपल्या फलंदाजीनेही अनेकदा इतिहास रचला आहे.
विकेटकीपर-फलंदाजांच्या कामगिरीवर नजर टाकूया, ज्यांनी वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक खेळी साकारल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी या यादीत अग्रस्थानी आहेत. त्याने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 145 चेंडूंत नाबाद 183 धावांची अविस्मरणीय खेळी केली होती.
त्यांच्या या खेळीत 15 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश होता, तर स्ट्राइक रेट 126.20 इतका होता.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू क्विंटन डिकॉक आहे. त्याने 2016 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 113 चेंडूंत 178 धावांची तुफानी खेळी साकारली होती.
या खेळीत 16 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 157.52 इतका होता.
तिसऱ्या स्थानी बांगलादेशचा लिटन दास आहे. त्याने 2020 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 143 चेंडूंचा सामना करत 176 धावा फटकावल्या होत्या.
त्याच्या या खेळीत 16 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता आणि त्याचा स्ट्राइक रेट 123.07 राहिला.
या यादीत चौथ्या स्थानावर क्विंटन डिकॉक याचेच नाव आहे. त्याने 2023 मध्ये बांगलादेशविरुद्ध 140 चेंडूत 174 धावांची खेळी केली.
ज्यात 15 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. त्यांचा स्ट्राइक रेट 124.28 इतका होता.