पित्ताचा त्रास होतोय, काय टाळावे...काय खावे...

Shambhuraj Pachindre

छातीत जळजळ, पोटात गॅस धरणे, पोट फुगणे, तोंडाला पाणी सुटणे, पोट साफ नसणे ही सर्वसाधारणपणे पित्त वाढल्‍याची लक्षणे असतात.

डोकेदुखी, उलटीची भावना, दात आंबणे अशा शारिरीक तक्रारीकडे दुर्लक्ष केले की, आम्लपित्त विकाराचा त्रास सुरु होतो. 

अवेळी खाणे, सतत खाणे अशा सवयींमुळे पित्ताचा विकार बळावण्‍याची शक्‍यता असते.  

पित्ताचा उपद्रव 'अॅसिडिटी'च्या रूपाने होतो. बऱ्याच वेळा 'अल्सर' ही या विकाराची पहिली पायरी असते.

पित्ताच्‍या त्रासातून मुक्‍त होण्‍यासाठी आयुर्वेदामध्‍ये अनेक उपाय सांगितले आहेत.

पित्ताचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भाताच्या साळी, राजगिरा किंवा ज्वारीच्या लाह्या खाणे.

चहा, खूप तिखट, आंबट पदार्थ, चमचमीत पदार्थ खाणे टाळावे.  

व्‍यसन हे पित्ताला आमंत्रण देतात म्‍हणून व्‍यसन टाळली तर पित्ताचा त्रासही टळतो.