पुढारी वृत्तसेवा
केळं आरोग्यासाठी सुपरफूड
केळ्यामध्ये पोटॅशियम, फायबर आणि अनेक आवश्यक पोषक तत्त्वे असतात.
कच्चं केळं कसं फायदेशीर?
कच्च्या केळ्यात रेसिस्टंट स्टार्च जास्त असतो, जो पचन आणि गट हेल्थसाठी चांगला मानला जातो.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये मदत
थोडंसं कमी पिकलेलं केळं ब्लड शुगर हळूहळू वाढवते.
जास्त पिकलेलं केळं पचायला सोपं
पूर्ण पिकलेलं केळं सहज पचते आणि पटकन ऊर्जा देते.
व्यायामानंतर कोणतं चांगलं?
वर्कआउटनंतर पिकलेलं केळं खाल्ल्यास शरीराला पटकन एनर्जी मिळते.
वजन कमी करताना कोणतं खावं?
कमी पिकलेलं केळं जास्त वेळ पोट भरल्यासारखे ठेवू शकते.
पचनसंस्था संवेदनशील असेल तर?
ज्यांना पचनाचा त्रास असतो त्यांनी खूप कच्चं केळं टाळावं.
काळे डाग आलेलं केळं वाईट असतं का?
नाही, खूप काळपट नसल्यास असे केळं गोड आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असू शकते.
मग नेमकं कोणतं बेस्ट?
तुमच्या आरोग्याच्या गरजेनुसार दोन्ही प्रकारचे केळे फायदेशीर ठरू शकतात.