Jadeja : जड्डूचा अर्थ ‘जादू’... WTC फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ चिंतेत

रणजित गायकवाड

जडेजा आता ICC डब्ल्यूटीसी फायनल 2023 मध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

WTC Final 7 जून पासून लंडन येथील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिआ आमनेसामने आहेत.

ICC ने जडेजाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षणाचा सराव करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा दिसत आहे. जो एका शब्दात विश्लेषन करताना जडेजाला ‘जादू’ असे संबोधतो.

हा व्हिडिओ आणि ख्वाजाच्या म्हणण्यानुसार ऑस्ट्रेलिया संघाला सध्या जडेजाची खूप भीती वाटत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ओव्हलवर जडेजाचे रेकॉर्ड लक्षवेधी आहे. या मैदानावर त्याने 2 कसोटी खेळल्या असून 126 धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here