अभिनेता, मॉडेल आणि अँकर अशा वेगवेगळ्या भूमिकेत समोर आलेला अभिनेता म्हणजे रवी दुबे.रवी आता नमित मल्होत्रा यांच्या ‘रामायण'मधून प्रेक्षकांच्या समोर येतो आहे. रवीने मॉडेलिंग मधून करियरची सुरुवात केली.त्याने ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यावेळी त्याला त्या कामाचे 500 रुपये मिळाले होते.सास बिना ससुराल या मालिकेने त्याला मुख्य अभिनेता म्हणून ओळख दिली.त्यानंतर जमाई राजा या मालिकेने त्याला रातोरात स्टार बनवले.तसेच रवी नच बलीये 5 आणि खतरों के खिलाडी या शोमध्ये दिसला होता.रवी आणि त्याची पत्नी सरगून मेहताने अनेक मालिकांची निर्मितीही केली आहे