Namdev Gharal
जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये आणि कथांमध्ये रेवनला 'भविष्य सांगणारा' किंवा जादूई पक्षी मानले गेले आहे.
वास्तव: विज्ञान सांगते की रेवन भविष्य जाणत नाही, पण तो कमालीचा हुशार आणि चतुर असतो. त्याच्या याच चाणाक्षपणामुळे लोक त्याला भविष्यवेत्ता समजतात.
रेवन हा पक्ष्याला काहीजण मोठा कावळा समजतात पण तो वेगळा आहे. ते दोन्ही एकाच वंशातील असले तरी : रेवन हा सामान्य कावळ्यापेक्षा आकारने खूप मोठा असतो. हे दोन्ही पक्षी एकाच 'कोर्व्हिडे' (Corvidae) परिवारातील आहेत
रेवनची चोच मोठी, जड आणि त्यावर केस सारखी पिसे असतात, तसेच उडताना त्याची शेपटी 'V' आकाराची दिसते; याउलट कावळ्याची चोच सरळ असते आणि शेपटी पंख्यासारखी गोल दिसते.
रेवन माणसांचे चेहरे लक्षात ठेवू शकतात, अवघड कोडी सोडवू शकतात आणि भविष्यातील गरजेसाठी अन्न लपवून ठेवण्याचे 'नियोजन' (Planning) करू शकतात.
असल्यामुळे आणि भविष्यातील गरजेसाठी अन्नाचे नियोजन करत असल्यामुळे जुन्या कथांमध्ये त्याला भविष्यवेत्ता मानले गेले आहे.
पाश्चात्त्य देशांमध्ये रेवन पक्ष्याला 'डार्क आर्ट्स' किंवा ब्लॅक मॅजिकचे प्रतीक मानले जाते. तिथले तांत्रिक आणि जादुगार असे मानतात की रेवन हा जिवंत जग आणि मृत जग यांमधील दुवा आहे,
काही तांत्रिक यामुळे मृतांच्या आत्म्यांशी संपर्क साधून भविष्य जाणून घेण्यासाठी त्याचा काळया जादूसारख्या विधींमध्ये वापर करतात.
रेवन प्रामुख्याने उत्तर गोलार्धात म्हणजेच आशिया, युरोप आणि उत्तर अमेरिकेतील घनदाट जंगले, पर्वतीय भाग, बर्फाळ प्रदेशात राहणे पसंत करतो. भारतात तो प्रामुख्याने लडाख आणि हिमालयाच्या उंच पर्वतीय भागात आढळतो.
जगातील अनेक संस्कृतींमध्ये जर प्रवासाला निघताना रेवन डाव्या बाजूने उडून गेला तर संकट येणार, आणि उजव्या बाजूने गेला तर यश मिळणार, अशा अंधश्रद्धा अजूनही पाळल्या जातात.
विज्ञानाच्या दृष्टीने रेवनमध्ये कोणतीही अलौकिक किंवा जादूची शक्ती नसते.ज्योतिषी किंवा ब्लॅक मॅजिकवाले त्याचा वापर केवळ लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी करतात.
असे मानतात की स्कॅन्डिनेव्हियन संस्कृतीमध्ये 'ओडिन' या प्रमुख देवतेकडे 'हुगिन' (विचार) आणि 'मुनिन' (स्मरणशक्ती) नावाचे दोन रेवन पक्षी होते. हे पक्षी जगभर फिरून ओडिन देवाला भविष्यातील गुप्त बातम्या आणून द्यायचे.