पर्यटकांचे आकर्षण केंद्र असलेला राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे.पावसाळ्यात या धबधब्याचे रौद्र रुप पाहायला मिळते .याठिकाणी पर्यटकांची रेलचेल सुरु झाली आहे.याठिकाणी स्थानिक लोक गरमागरम भजी, चहा, मॅगी बनवून देतात .भाजलेले-उकडलेले मक्याचे कणीस, शेंगदाणे अशा खाद्यपदार्थांवर इथे ताव मारता येतो.कोल्हापुराहून राऊतवाडी धबधब्याला कसे जाल? .कोल्हापूर-हळदी-सडोली खालसा-हसूर दुमाला- राशीवडे-शिरगाव-पिरळ-पडळीतून जाता येते.पर्यटक इथे तुडूंब भिजण्याचा आनंद घेऊ शकतात