अभिनेत्री रश्मिकाच्या खात्यात आता आणखी एका बॉलीवुड सिनेमाची भर पडली आहे.रश्मिका आता कॉकटेल 2 मध्ये दिसणार आहे.या सिनेमात तिच्यासोबत शाहीद कपूर आणि कृती सनॉनही दिसणार आहे.शाहिदने एक इंस्टा स्टोरी शेयर केली आहे. त्यात त्याने कृती आणि रश्मिकाला टॅग केले आहे.हा सिक्वेल मॅडॉक फिल्म्सची निर्मिती आहे.याबाबत रश्मिकानेही इंस्टा पोस्ट केली आहे.त्यात शाहिद आणि कृतीला टॅग करत म्हणते गॅंग तुम्ही कुठे आहात?.हा सिनेमा 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.रश्मिका मॅडॉक फिल्म्सच्या थामा सिनेमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.थामा हा हॉरर कॉमेडी सिनेमा आहे