पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री रश्मिका मंदानाचा नुकताच 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
तिने 'द गर्लफ्रेन्ड' चित्रपटाच्या टीमसाठी आणि खासकरून तिच्या 'भूमा' या पात्रासाठी एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या लांबलचक पोस्टमध्ये तिने चित्रपटाच्या कथेबद्दल, दिग्दर्शकाबद्दल आणि संपूर्ण टीमबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
रश्मिकाने खुलासा केला की, दिग्दर्शक राहुल रविंद्रन यांनी तिला पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा ती भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी आले.
तिने सांगितले, चित्रपटातून दोन गोष्टी मिळाल्या, मला माहित होते की या चित्रपटातील भूमिका केली नाही तर पाप असेल.. आणि दुसरी आयुष्यभरासाठी एक मित्र मिळाला.
रश्मिकाने तिच्या 'भूमा' या पात्राला सर्वात खास मानले आहे. ती म्हणते, "भूमा हे पात्र माझ्यासाठी सर्वात खास आहे, कारण ते बहुतांशी मीच आहे."
भूमाच्या भूमिकेमुळे आणि दिग्दर्शक राहुल यांच्याशी असलेल्या समन्वयामुळे प्रत्येक सीनमध्ये तिला जास्त स्पष्टीकरण देण्याची गरज पडली नाही, असेही तिने नमूद केले.
'द गर्लफ्रेन्ड' या चित्रपटात रश्मिकाने भूमा देवी नावाच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे, जी एका टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये अडकलेल्या मुलीची कहाणी आहे.