Rashmika Mandanna : रश्मिकाचा २१ व्या वर्षीच झाला होता साखरपुडा; पहिलं प्रेम.., पण लग्नाआधीच का तुटलं नातं?

पुढारी वृत्तसेवा

'पुष्पा' चित्रपटातून 'नॅशनल क्रश' बनलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आज यशाच्या शिखरावर आहे.

Rashmika Mandanna

एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट तिच्या हातात आहेत. पण तिच्या व्यावसायिक आयुष्याइतकं तिचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. 

Rashmika Mandanna

तुम्हाला माहित आहे का, की वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी रश्मिकाचा साखरपुडा झाला होता आणि काही कारणास्तव तो मोडलाही होता? 

Rashmika Mandanna

ही गोष्ट आहे २०१६ सालची. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी त्यांच्या 'किरिक पार्टी' या चित्रपटासाठी रश्मिकाची निवड केली. 

Rashmika Mandanna

या चित्रपटात तिचा सहकलाकार होता रक्षित शेट्टी. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. अवघ्या ४ कोटींच्या चित्रपटाने ५० कोटींची कमाई केली होती.

Rashmika Mandanna

या पहिल्याच चित्रपटाने रश्मिकाला स्टार बनवले. 'किरिक पार्टी'च्या चित्रीकरणादरम्यान रश्मिका आणि रक्षित शेट्टी यांच्यात जवळीक वाढली.

Rashmika Mandanna

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांच्यातील प्रेमसंबंध अधिक घट्ट झाले. ३ जुलै २०१७ रोजी एका खासगी समारंभात दोघांनी साखरपुडा केला.

Rashmika Mandanna

साखरपुड्याच्या वेळी रक्षित शेट्टी ३४ वर्षांचा होता, तर रश्मिका केवळ २१ वर्षांची होती. दोघांमध्ये तब्बल १३ वर्षांचे अंतर असूनही त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 

Rashmika Mandanna

मात्र, सप्टेंबर २०१८ मध्ये, दोघांनीही साखरपुडा मोडल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

Rashmika Mandanna

एकमेकांशी न पटणे आणि वैचारिक मतभेद हे कारण त्यांनी त्यावेळी दिले होते.

Rashmika Mandanna

मात्र, अनेक रिपोर्ट्सनुसार, 'किरिक पार्टी'च्या प्रचंड यशानंतर रश्मिकाला अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.

Rashmika Mandanna

तिला लग्नाच्या जबाबदारीत अडकण्याऐवजी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते, त्यामुळे तिने हे नाते संपवण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते.

Rashmika Mandanna

हे नातं तुटलं असलं तरी रश्मिका आणि रक्षित आजही एकमेकांशी आदराने वागतात.  

Rashmika Mandanna

रक्षित सध्या सिंगल आहे, तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून रश्मिकाचे नाव साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत जोडले जात आहे.

Rashmika Mandanna
पालवी कदम म्हणते, "मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे"