अभिनेत्री रश्मी देसाई आणि नंदिश संधुने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला आहे.यानंतर नुकतेच नंदिशच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले.गर्लफ्रेंड कविता बॅनर्जीसोबत नंदिशने साखरपुडा केला आहे.या पोस्टनंतर रश्मिने एक सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, चुकून चुकल्याने त्यातूनच शिकले आहे, त्यामुळे जास्त ज्ञान देऊ नका जीवनाचा आनंद घ्या.अर्थात रश्मीने ही पोस्ट नंदिशला उद्देशून केली असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.रश्मि आणि नंदिशने उतरन या मालिकेत एकत्र काम केले होते..या मालिकेदरम्यान ते प्रेमात पडले आणि लग्नही केले..यानंतर एकमेकांसोबत मतभेद झाल्याने ही जोडी वेगळी झाली होती