Ghost of the sea : जपानच्या समुद्रात दिसली दुर्मिळ गूढं किलर घोस्ट ऑर्का!

Namdev Gharal

जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर एक किलर व्हेल म्हणजे ऑर्का दिसली असून जगभरातील समुद्रजीव अभ्यासकांचे कुतुहूल जागे झाले आहे.

उत्तर जपानमधील होक्काइदो बेटाजवळील राउसू (Rausu, Hokkaido) किनाऱ्यालगत एका मच्छिमार बोटीला मासेमारी करताना या अत्यंत दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या किलर व्हेलचे (White Orca) दर्शन झाले.

कळपासह वावर: ही पांढरी व्हेल सामान्य काळ्या-पांढऱ्या ओरका व्हेलच्या कळपासोबत (Pod) पोहताना कॅमेऱ्यात कैद झाली.

वैज्ञानिकांच्या मते, हा रंग 'ल्युसिझम' (Leucism) किंवा 'अल्बिनिझम' (Albinism) या दुर्मिळ जनुकीय बदलामुळे निर्माण होतो.

गडद निळ्या समुद्राच्या पाण्यात हा पांढरा महाकाय जीव अचानक पोहताना एखाद्या अदृश्य सावलीसारखा किंवा भुतासारखा भासतो. यामुळे याला व्हाईट ओरकाला 'घोस्ट व्हेल' म्हणतात

जपानी दंतकथांमध्ये समुद्रात अचानक प्रकट होणाऱ्या पांढऱ्या व गूढ व्हेलचा उल्लेख 'घोस्ट व्हेल' (Bake-kujira) म्हणून आढळतो

हजारो सामान्य ओरकांमध्ये एखादीच अशी पांढरी ओरका अस्तित्वात असते. समुद्रात ती सहज नजरेस पडत नसल्याने आणि अचानक अदृश्य होत असल्याने तिला 'घोस्ट ऑफ द सी' असेही संबोधले जाते.

किलर व्हेल (Orca) च्या नावामध्ये 'व्हेल' असले तरी ओरका ही प्रत्यक्षात समुद्रातील डॉल्फिन कुळातील जगातील सर्वात मोठी प्रजाती आहे.

सर्वोच्च शिकारी : समुद्रात यांचा कोणताही नैसर्गिक भक्षक नाही. त्या मासे, सील, पेंग्विन आणि अगदी मोठ्या शार्क व व्हेलचीही शिकार करतात.

वेग आणि आकार: नर ओरकाची लांबी ६ ते ८ मीटर आणि वजन ६ टनांपर्यंत असू शकते. त्या पाण्यात ताशी ५० ते ५६ किमी वेगाने पोहू शकतात.