Albino Cobra : पांढरा नाग किती दुर्मिळ? किती वर्षे जगतो, विष जहाल की सौम्य?

Namdev Gharal

नुकतीच बत्तीस शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी साजरी झाली. यावेळच्या नागपंचमीचे वैशिष्ट्ये म्हणजे तेथिल किच्च्याड ग्रुप ला सापडलेला दुर्मिळ पांढरा नाग

नाग हा पांढरा कसा होतो किती दुर्मिळ असतो, किती वर्षे जगतो तसचे त्‍याचा रंग व त्‍याचे विष याचा काही संबध आहे का हे जाणून घेऊ

पांढरा नाग ही नागाची कोणतीही वेगळी प्रजाती नसून एका विशिष्ट जनुकीय बदलामुळे तयार होणारा दुर्मिळ नाग आहे. याला अल्बिनो कोब्रा असे म्हणतात, याचा रंग पांढरा किवा फिकट गुलाबी असतो

निसर्गात अल्बिनो किंवा ल्युसिस्टिक नाग आढळणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. साधारणपणे १०,००० ते ३०,००० नागांमध्ये एखादाच पांढरा नाग जन्माला येतो.

जरी याचा रंग पांढरा असला तरी हा नाग सामान्य भारतीय नागाइतकाच अत्यंत जहाल विषारी असतो. रंगाचा त्याच्या विषाच्या तीव्रतेवर कोणताही परिणाम होत नाही. किंवा ते सौम्य असत नाही

अल्बिनिझम (Albinism): शरीरात त्वचेला आणि डोळ्यांना रंग देणारे मेलॅनिन (Melanin) हे रंगद्रव्य तयार न झाल्यामुळे नाग पूर्णपणे पांढरा किंवा फिकट पिवळसर दिसतो.

ल्युसिझम (Leucism): यात शरीरातील सर्व रंगद्रव्यांची कमतरता असते, पण डोळ्यांचा नैसर्गिक रंग काळा किंवा गडद राहतो.अशा नागांचे डोळे लाल किंवा गुलाबी रंगाचे असतात.

जनुकीय वारसा: जेव्हा दोन्ही पालकांमध्ये हा सुप्त जनुकीय गुण असतो, तेव्हाच जन्माला येणाऱ्या पिल्लाचा रंग पांढरा होतो.

पांढऱ्या रंगामुळे ते गवतात किंवा मातीत सहज लपून राहू शकत नाहीत. त्यामुळे जन्मानंतर लगेचच इतर शिकारी प्राणी, पक्षी किंवा माणसांकडून ते सहज मारले जातात, ज्यामुळे निसर्गात ते अधिकच दुर्मिळ ठरतात.

नैसर्गिक अधिवासात पांढरा रंग लपण्यासाठी अडथळा ठरत असल्याने आणि अंधुक दृष्टीमुळे त्यांचे जगणे कठीण असते. त्यामुळे जंगलात ते सहसा ३ ते ८ वर्षेच जगू शकतात.

शिकारी प्राणी आणि अन्नाची कमतरता नसल्यास, तसेच योग्य औषधोपचार मिळाल्यास ते सामान्य नागांप्रमाणेच १५ ते २० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगू शकतात.