Namdev Gharal
T-84 ॲरोहेड वाघीणीने सलग १० वर्षे रणथंबोरच्या तलावालगतच्या झोन ३ या इलाक्यावर राज केले
‘रणथंबोरची राणी’ तसेच ‘मगरमच्छ की शिकारी’ अशीही ॲरोहेडची ओळख होती
मछली या शूर वाघीणीची ही नात तर T-19 कृष्णा ही ॲरोहेडची आई होती तर T-28 हा नर तिचे वडील होते
जन्मताच तिच्या डाव्या गालावर बाणाचे चिन्ह असल्याने तिला ‘ॲरोहेड’ हे नाव पडले
फेब्रुवारी २०१४ मध्ये तीचा जन्म झाला होता वयाच्या १८ व्या महिन्यापासून तिने या इलाक्यावर आपला दबदबा कायम ठेवला
शिकारीच्या अनोख्या अंदाजासाठी ॲरोहेड प्रसिद्ध होती मगरीच्या शिकारीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
आपल्या जीवनकाळात ती चारवेळा आई बनली तिने एकूण १० बछड्यांना जन्म दिला.
रणथंबोरमधील वनाअधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गेली दीड वर्षे ॲरोहेड ही बोन कॅन्सरने ग्रस्त होती.
सचिन राय या वन्यजीव छायाचित्रकाराने शेअर केलेला ‘द फायनल वॉक’ हा तिचा शेवटचा व्हिडीओ खूपच भावनिक आहे.