राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची लवस्टोरी वेगळी आहे.एका म्युझिक व्हीडियो शूट दरम्यान हे दोघे भेटले होते.यानंतर 10 वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले.पहिल्यांदा राजकुमारला भेटल्यावर पत्रलेखा खूप नर्वस होती.कारण त्याच्या पहिल्या सिनेमात त्याचे काम पाहून तो भयानक असल्याचे तिला वाटत असते.पण जशी त्यांची भेट झाली तेव्हा तिच्या लक्षात आले की राजकुमार खूपच भावनिक आहे.त्याच्यातील कलाकार पत्रलेखाला भावल्याचे ती सांगते.10 वर्षाच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.2021 मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली