Science Mystery : काचेच्या ग्लासवर ट्रॅक्टर, तरंगणारी मोटरसायकल : राजस्थानचा 'घास भैरू महोत्सव’ जादूटोणा की स्मार्ट सायन्स?

Namdev Gharal

राजस्थानमधील बूंदी जिल्ह्यातील (प्रामुख्याने सथूर, बड़ौदिया, ठीकरदा आणि हिंडोली या गावांमध्ये) दरवर्षी दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दिवशी 'जादुई' करामतींचा एक महोत्‍सव साजरा होतो घास भैरु महोत्‍सव

या महोत्‍सवात काही अतार्किक गोष्टी केल्या जातात नोटांच्या बंडलावर ट्रॅक्टर उभा केला जातो, हवेत बाईक तरंगते, डोके नसलेला माणूस, पाण्यात न बुडणारे दगड असे चमत्‍कार दाखवले जातात हा काय जादूटोणा असतो का हे पाहू

या उत्सवात लोकदेवता 'घास भैरू' यांचे प्रतीक असलेल्या एका मोठ्या दगडाला रस्सीने बांधून, त्या रस्सीला तब्बल ११ जोडी बैल जुंपले जातात. ढोल-ताशांच्या गजरात आणि बैलांच्या मागे धावत संपूर्ण गावात मिरवणुक काढली जाते

त्‍यानंतर या महोत्सवात असे अनेक देखावे असतात जे पाहून सामान्य माणसाला ते 'जादू' किंवा 'चमत्कार' वाटतात, पण प्रत्यक्षात गावातील स्थानिक कलाकार यामागे हातचलाखी (Illusion) आणि विज्ञानाचा अत्यंत हुशारीने वापर करतात.

काचेच्या ग्लासवर उभा असलेला ट्रॅक्टर किंवा JCB - यामध्ये जमिनीखाली किंवा टायरच्या आडून जाड लोखंडी रॉड लावलेले असतात, जे सर्व वजन पेलतात. काचेचे ग्लास केवळ टायरच्या कडेला आधाराचा आभास निर्माण करण्यासाठी ठेवलेले असतात.

जर खरोखरच काचेवर वजन दिले असेल, तर जाड टफन ग्लास (Toughened Glass) आणि लाकडी फळ्यांचा वापर करून वजन मोठ्या पृष्ठभागावर विभागले जाते, ज्यामुळे दाब कमी होतो.

धडापासून वेगळे झालेले डोके : हा एक जुना पण प्रभावी 'मिरर इल्यूजन' (Mirror Illusion). कलाकार जमिनीत खड्डा खणून किंवा एका विशिष्ट कोनात बसतो, समोर आरसाशाची अशी रचना केली जाते की फक्त त्याचे डोके ताटात किंवा जमिनीवर ठेवल्यासारखे दिसते

हवेत तरंगणारी मोटरसायकल : मोटरसायकल किंवा दगडाच्या मागच्या बाजूने जमिनीत घट्ट रोवलेला मजबूत लोखंडी पाईप असतो. हा पाईप वस्तूच्या रंगांत रंगवलेला असतो किंवा कपडे/झुडपांच्या आड लपवलेला असतो.

पाण्यावर, हवेत तरंगणारे जड दगड: गावातील विहिरीत किंवा बावडीत तरंगणारे दगड हे खरे दगड नसून थर्माकोल, फायबर, किंवा पोकळ लाकडापासून बनवलेले असतात. त्यांना सिमेंट किंवा मातीचा लेप देऊन हुबेहूब खडकासारखा रंग दिला जातो.

हा महोत्सव म्हणजे केवळ अंधश्रद्धा नसून, ग्रामीण भागातील तरुणांची अभियांत्रिकी , भौतिकशास्त्राचे व्यावहारिक ज्ञान आणि समूहाने आनंद साजरा करण्याची एक अनोखी परंपरा आहे.