भारतात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आणि आश्चर्यकारक परंपरा जपल्या जातात. .राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील मांडल कसबा येथे दिवाळीनंतर केली जाणारी एक अशीच अनोखी परंपरा आहे. जिथे चक्क गाढवांची पूजा केली जाते..ज्याप्रमाणे शेतकरी बैलाची पूजा करतात, त्याचप्रमाणे या गावात गाढवांना मान दिला जातो..कुंभार समाजाचे लोक पिढ्यान्पिढ्या ही परंपरा जपत आहेत. .मानवी वाहतूक आणि माल वाहतुकीचे साधन नसताना गाढवेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन होते. .गाढवांवरून माती वाहून आणली जात असे, ज्याचा उपयोग भांडी बनवण्यासाठी होत असे. .गाढवांनी केलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही प्रथा सुरू झाली..दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मांडल कसबा येथे परिसरातील लोक एकत्र येतात. .या दिवशी गाढवांना सजवले जाते, त्यांना विविध पक्वान्न खायला दिले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. .या पूजेनंतर गाढवांची शर्यत आयोजित केली जाते. त्याला भडकाया असे म्हणतात. ही परंपरा गाढवांविषयी असलेला आदर आणि कृतज्ञता दर्शवते.