रहस्‍यमय भूल-भुलैया : राजस्‍थानमधील चाँद बावडी

Namdev Gharal

राजस्‍थान येथील अनेक वास्‍तू या रहस्यांनी भरलेल्‍या आहेत. अनेक महल, राजवाडे, गडकिल्‍ले यांचा समृद्ध वारसा राजस्‍थानला आहे.

यामध्ये एक आहे चाँद बावडी जयपूरजवळील अबानेरी गावात ही बावडी आहे, अनेक रहस्‍य असल्‍यामुळे तिला भारतातील "गुप्त खजिना" म्हणूनही ओळखलं जातं.

भूतांचे वास्‍तव्य? : स्थानिक लोकांमध्ये अशी दंतकथा आहे की रात्री बावडीत भूतांचे वास्तव्य असते, म्हणून सूर्यास्तानंतर कोणी आत जात नाही!

बावडीच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल ३५०० पेक्षा जास्त पायऱ्या आहेत - भौमितीकदृष्‍ट्या इतक्या अचूक पद्धतीने कोरल्‍या आहेत की प्रत्येक कोनातून पाहिल तरी त्‍या भ्रम निर्माण करतात

इतिहासकारांच्या मते या बावडीची निर्मिती १००० वर्षांपूर्वीची असून ही बावडी (विहीर) इ.स. ८०० च्या सुमारास राजा चांद (चंद राठोड) यांनी बांधली. म्हणूनच तिचं नाव पडलं “चांद बावडी” असे पडले आहे.

या पायऱ्या म्‍हणजे भूलभूलय्या आहेत. यावरुन खाली उतरताना किंवा बाहेर येताना माणूस चक्रावून जाऊ शकतो. काही वेळा वर येण्याच्या पायऱ्या कोणत्‍या हेच विसरतो.

याची तळापासून जमिनीपर्यंतची उंची सुमारे ३० मिटर आहे. म्‍हणजे सुमारे १३ मजले खोल आहे, आणि भारतातील सर्वात खोल बावडींपैकी एक आहे.

वास्तुशास्त्राचं अप्रतिम उदाहरण – बावडी अशा प्रकारे बांधली आहे की सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे पाणी नेहमी थंड राहते.

या विहीरीजवळ गेल्‍यावर तापमानात फरक पडतो. वरच्या हवेपेक्षा तळाच्या भागात सुमारे ५-६ अंश सेल्सिअस तापमान कमी आढळते.

बावडीच्या भिंतींवरील कोरीवकाम, देवी-देवतांच्या मूर्ती आणि दगडांची सममिती आजही अभियंते आणि वास्तुविशारदांना चकित करते.

The Dark Knight Rises, The Fall या सारख्या हॉलिवूड चित्रपटांचे शूटींगही येथे झाले आहे.

Kangal Dog :अस्वलाशीही लढणारा सर्वात मोठा शिकारी कुत्रा!