Raincoat Purchase : नवीन रेनकोट घेताय? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!

Namdev Gharal

यावर्षीच्या पावसाला आता जोरदार सुरवात झाली असून अनेकजन रेनकोट खरेदीकडे वळले असतील. पण रेनकोट योग्य मिळाला नाही तर खूप वाईट वाटते त्‍यामुळे रेनकोट खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या

फॅब्रीक तपासा : मुसळधार पावसासाठी 'वॉटरप्रूफ' (Waterproof) मटेरियल असलेलाच रेनकोट निवडा. त्यांवर PVC किंवा PU कोटिंग आहे का ते पाहा, हे कोटींग उत्तम पाणी प्रतिबंधक बनतात.

ब्रिदेबल फॅब्रिक : रेनकोट घातल्यावर आतून खूप घाम येतो. त्यामुळे फॅब्रिक 'ब्रिदेबल' असेल तर आतील हवा खेळती राहते आणि घाम घाम होत नाही.

टू-पीस (Two-Piece - पँट आणि शर्ट): जर तुम्ही टू-व्हीलर चालवत असाल, तर टू-पीस रेनकोट सर्वोत्तम ठरतो. यामुळे पायही पूर्ण कोरडे राहतात आणि गाडी चालवताना सोयीचे होते.

वन-पीस किंवा पॉन्चो (One-Piece / Poncho): चालणाऱ्या लोकांसाठी किंवा लोकल/बसने प्रवास करणाऱ्यांसाठी वन-पीस (लांब कोट) किंवा पॉन्चो सोयीचे पडतात.

शिलाई बघून घ्याः रेनकोटच्या कपड्याचे तुकडे जिथे एकत्र शिवले जातात (Stitching), तिथून पाणी आत जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

खरेदी करताना शिलाईवर आतल्या बाजूने 'टेप केलेले सीम' आहेत का ते नक्की पहा. शिवणकामावर वॉटरप्रूफ टेप लावलेली असेल, तर तिथून एक थेंबही पाणी आत शिरत नाही. त्‍यामुळे टेप लावली असल्याची खात्री करा

रेनकोटची मुख्य चेन प्लास्टिक किंवा नायलॉनची असावी कारण मेटलची चेन गंजते, चेनच्या वरून एक फॅब्रीक पट्टी आणि त्यावर बटणे किंवा वेल्क्रोची पट्टी असावीत, जेणेकरून वेगाने येणाऱ्या पावसाचे पाणी चेनमधून आत जाणार नाही.

हुड (टोपी): टोपीला ओढण्यासाठी दोरी असावी, जेणेकरून ती डोक्यावर घट्ट बसेल. तसेच टोपीच्या पुढे 'वायझर' असेल तर पाणी थेट तोंडावर उडत नाही.

हाताच्या मनगटापाशी इलॅस्टिक किंवा वेल्क्रो (Velcro) पट्टी असावी, जेणेकरून हातामधून पाणी आत शिरणार नाही.

रेनकोट नेहमी तुमच्या नेहमीच्या कपड्यांच्या साईझपेक्षा एक साईझ मोठा घ्यावा. कारण पावसाळ्यात तुम्ही आतून फॉर्मल कपडे, स्वेटर घालता तसेच पाठीवर बॅग अडकवणे सोपे जाते

पावसाळ्यात अंधार किंवा धुक्यामुळे समोरील वाहनांना आपण दिसत नाही. म्हणूनच रेनकोटच्या पाठीवर किंवा हातावर 'रिफ्लेक्टीव्ह पट्ट्या' (Reflector Strips) असणे अत्यंत गरजेचे आहे.

बजेट थोडे जास्त गेले तरी चालेल, पण चांगल्या दर्जाचा आणि 'सील्ड सीम' (Sealed Seams) असलेला रेनकोट घ्या, जो किमान २-३ वर्षे उत्तम साथ देईल!