पुढारी वृत्तसेवा
अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या आगामी 'साली मोहब्बत' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आलेल्या एका अत्यंत वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.
राधिकाने २००० च्या दशकातील एक आठवण सांगितली. ती म्हणाली, एका छोट्या शहरात चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तिथे मी एकमेव महिला होते आणि बाकी सर्व पुरुष होते.
"शूटिंगदरम्यान निर्माते-दिग्दर्शक मला माझ्या bums आणि breasts वर अधिक पॅडिंग लावण्यास सांगत होते. ते वारंवार अम्मा, अजून पॅडिंग लावा असे म्हणायचे."
तिने पुढे सांगितले की, "शेवटी वैतागून मी त्यांना विचारले की, तुम्ही एखाद्या व्यक्तीला किती गोलाकार बनवणार आहात? तुमच्या घरातल्या स्त्रियांनाही तुम्ही असेच सांगता का?"
राधिकाने पुढे सांगितले की, तिला त्या काळात स्वतःचा मॅनेजर किंवा साहाय्यक घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
"मी पूर्णपणे एकटी होते. मला माझी टीम आणू दिली नव्हती आणि तिथे मला मदत करणारे कोणीच नव्हते. तो अनुभव माझ्यासाठी अत्यंत भयावह होता. आजही ती आठवण काढली तरी मला रडू येते," अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या."
केवळ पैशांची गरज असल्याने आपण त्यावेळी ते काम केल्याची कबुलीही तिने यावेळी दिली.