Pygmy Marmoset : हाताच्या तळव्याएवढे माकड

Namdev Gharal

तुमच्या हातात मावेल असे माकड तुम्‍ही कधी पाहिले आहे का, हे माकड पुर्ण वाढ झालेले असूनही तुमच्या हातात बसू शकते

याचे वजन केवळ १०० ग्रॅम एवढे असते. म्‍हणजे आपल्‍या मोबाईल फोन पेक्षाही कमी आकाराचे.

याचे नाव आहे पिग्‍मी मार्मोसेट(pygmy marmoset) असे या माकडाचे नाव आहे. आणि ही जगातील सर्वाल लहान माकडाची प्रजाती आहे

हे माकड दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनच्या जंगलात आढळते.ब्राझील, कोलंबिया, पेरू, इक्वेडॉर व बोलीव्हिया या देशांत यांचा वावर असतो

याचे वैशिष्‍ठ्य म्‍हणजे हे एखाद्या सुपरहिरोसारखे हवेत झेप घेऊ शकतात. हे आकाराने एवढे लहान असूनही एका फांदीवरुन दुसऱ्या फांदीवर १६ फूटापर्यंत उडी मारु शकतात

पूर्ण वाढ झालेल्‍या पिग्मी मार्मोसेटची लांबी फक्त 12 ते 16 सें.मी. असते. शेपटी 17 ते 23 सें.मी. लांब असते. पिलांची लांबी तर केवळ ५ सेमी असते. माणसाच्या हाताच्या बोटाएवढी

यांचा फर पिवळसर-तपकिरी, करडसर व काळपट पट्टे असलेला असतो. त्यामुळे ते झाडांच्या फांद्यांमध्ये सहज दडून राहतात.

याचे आणखी वैशिष्‍ट्य म्‍हणजे याचे डोळे मोठे असतात. डोळे मोठे असल्याने त्यांना रात्री व दिवसा दोन्ही वेळा चांगले दिसते

यांना जेव्हा राग येतो तेव्हा ते आपल्‍या मुठी आवाळतात व जोरजोरात किंचाळतात. याचा आवाज एखाद्या अलार्मसारखा असतो.

पिग्मी मार्मोसेटचा मुख्य आहार हा झाडांच्या सालीतून येणारा गोंद, रस, असतो आपल्‍या तीक्ष्ण दातांनी हे साल शोधून त्‍यातील रस शोषूण घेतात. लहान कीटक खातात.

पिल्लांना वाहून नेणे, खाऊ घालणे हे काम बहुतेक वेळा नर माकड करतो. हे अत्यंत चपळ, लहान व खेळकर माकड आहेत.