पुढारी वृत्तसेवा
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
यंदाही गणरायाला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
ढोल-ताशा पथके, पारंपरिक वाद्ये आणि गणपती बाप्पाच्या जयघोषामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
विसर्जन मार्गावरील ही रांगोळी पुणेकरांचे आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे.
गणपतींच्या मिरवणुकीने शहरातील वातावरण भक्तिमय झाले आहे.
बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची गर्दी
दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतील लक्ष्मी रोड हा महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो.