पुढारी वृत्तसेवा
आहारतज्ज्ञांच्या मते, दररोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने महिलांना त्यांचे आरोग्य संतुलित राखण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक नावाचे एक महत्त्वाचे खनिज असते.
जे महिलांमध्ये निरोगी आणि संतुलित ओव्हुलेशन, बीजांड गुणवत्ता आणि प्रोजेस्टेरॉन पातळी राखण्यासाठी आवश्यक असते.
भोपळ्याच्या बिया महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोन्स संतुलित करतात.
जे पीएमएस लक्षणे, मूड स्विंग आणि बेकआऊटस् दूर करण्यास मदत करू शकतात.
प्रत्येक महिलेला निरोगी त्वचा आणि केस हवे असतात, म्हणून या बियांचे सेवन करावे; कारण त्यात ओमेगा-3 आणि अँटिऑक्सिडंटस् असतात.
जे जळजळ कमी करण्यासाठी, कोलेजन उत्पादनास समर्थन देण्यासाठी आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असतात.
भोपळ्याच्या बियांमधील मॅग्नेशियमचे प्रमाण स्नायूंना आराम देते. महिलांसाठी, ते पेटके आणि दिवसाचा थकवा दूर करण्यास मदत करते.